[Marathi Suvichar] शालेय सुविचार | Marathi Suvichar for School Students
१) नम्रता हा माणसाचा खरा दागिना आहे.२) मुले म्हणजे नव जगाची आशा, उद्याचे जग बनविणारी थोर शक्ती म्हणजे मुले३) चांगले संभाषण आणि चांगली संगत म्हणजेच सद्गुण समजा.४) बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्यापूर्वी विचार केलेला बरा.५) जगात दुसऱ्याला हसणे सोपे परंतु दुसऱ्यासाठी रडणे कठीण.
- श्री आदित्य हृदय स्तोत्रम् (अर्थ सहित) | भगवान् सूर्य के प्रसिद्ध बारह नाम | श्री सूर्य कवचम् | श्री सूर्याष्टकम् | आरती सहित)
- इंच को सेमी में बदलें
- India, Malaysia move beyond dollar to settle trade in INR
- हेक्टेयर को बीघा में बदलें
- Sawan 2024: सावन में 72 साल बाद दुर्लभ संयोग, पहले दिन शुभ मुहूर्त में ऐसे करें महादेव की पूजा
[Marathi Suvichar] शालेय सुविचार | Marathi Suvichar for School Students
६) एकदा बोललेले खोटे लपवण्यासाठी अनेक वेळा खोटे बोलावे लागते, म्हणून खोटे बोलू नये.७) विजय हा मागून मिळत नसतो, तो धैर्याने झगडून मिळवावा लागतो.८) परिस्थिती सुधारण्यासाठी कृती सुधारा.९) जशी रत्न बाहेरून चमक दाखवितात, तशी पुस्तके आतून अंतःकरण उजळतात.१०) दुसऱ्याचे ओझे उतरविण्यासाठी जेव्हा तुम्ही पुढे होता, तेव्हा तुमचे ओझे पूर्वीपेक्षा हलके होईल हे नक्की.
Bạn đang xem: 100+ [Marathi Suvichar] शालेय सुविचार | Marathi Suvichar for School Students
११) जसा आरसा मळाने अस्वच्छ होतो, तसे मन अयोग्य कर्माने मलीन होते.१२) शरीराची जखम उघडी टाकल्याने चिघळते, तर मनाची जखम उघडी केल्याने बरी होते.१३) सावधपण उत्तम निर्णयशक्ती, स्वावलंबन, आणि दृढनिश्चय हे गुण यशासाठी आवश्यक असतात.१४) लोक आपल्याबद्दल काय बोलतात, त्याचा विचार करण्यापेक्षा लोक आपल्याबद्दल तसे का बोलतात त्याचा विचार करा.१५) जसे प्रकाशाच्या साह्याशिवाय वस्तू दिसत नाही, तसे विचाराशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही.
१६) देशातील प्रत्येक घर हे शाळा आहे आणि घरातील माता-पिता हे शिक्षक आहेत.१७) मनुष्य मरेपर्यंत विद्यार्थी असतो.१८) खरे बोलण्याचा एक दुय्यम फायदा असा होतो की, आपण कोणाशी काय बोललो हे लक्षात ठेवण्याची गरज नसते.१९) जगात असे एकच न्यायालय आहे की जेथे सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे आईचे प्रेम.२०) माणूस मोत्याच्या हाराने शोभून दिसत नाही तर घामाच्या धाराने शोभून दिसतो.
21-30 [Marathi Suvichar] शालेय सुविचार
२१) गरज ही शोधाची जननी आहे.२२) प्रार्थना हाच अहंकार नाशाचा उत्तम उपाय आहे.२३) आळस आणि अति झोप हे दारिद्र्याला जन्म देतात.२४) सुविचार हे बुद्धीला मिळालेले उत्तम खाद्य आहे.२५) माणसाचे सर्वात मोठे तीन शत्रू आहेत. आळस ,अज्ञान व अंधश्रद्धा.
२६) आयुष्यात नकार सुद्धा खेळाडू वृत्तीने स्वीकारायला शिका.२७) शाळेतील पहिला धडा जोडाक्षराने सुरू होत नसला, तरी आयुष्यातील पहिला पाठ जोडाक्षराने सुरू होतो, तो म्हणजे‘ कर्तव्य ‘.२८) प्रत्येक लहान किंवा मोठी गोष्ट करताना, मन प्रसन्न असावे.प्रसन्नता म्हणजे परमेश्वराचा आशीर्वाद.२९) खाली पडण्यात अपयश नाही, तर पडून राहण्यात अपयश आहे.३०) आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचे खरे कारण आहे.
Read Other Article: उत्तम मराठी सुविचार
31-40 [Marathi Suvichar] सोपे व चांगले सुविचार शालेय सुविचार
Xem thêm : क्रिया MCQ Quiz in हिन्दी – Objective Question with Answer for क्रिया – मुफ्त [PDF] डाउनलोड करें
३१) काळजी केल्याने उद्याचे दुःख कमी होत नाही, तर आजच्या दिवसाची ताकद नाहीशी होते.३२) उत्साही पुरुष कोणत्याही परिस्थितीत खचून जात नाही.३३) भाग्याची दारे सर्वत्र आहेत.गती आणि प्रगती करणाऱ्या प्रत्येकाच्या मार्गात ती लागतात.३४) रोगाच्या भयाने जितके लोक मरतात, इतके लोक रोगाने मरत नाहीत.३५) ज्याचा वर्तमान काळ प्रयत्नवादी आहे, त्याचा भविष्यकाळ उज्वल आहे.
३६) चांगल्या परंपरा निर्माण करणे कठीण असते, म्हणून आहेत त्या मोडू नका.३७) ज्या गोष्टीत आपला काहीही संबंध नाही, त्यात आपण नाक खुपसले तर फायदा न होता तोटाच होतो.३८) सर्व देशाच्या कानाकोपऱ्यातून चांगल्या कल्पना प्रस्तुत करणारी प्रकाशकेंद्रे म्हणजे विश्वविद्यालये आहेत.३९) श्रद्धा हा असा पक्षी आहे की, पहाटेच्या गर्द काळोखात त्याला प्रकाशाची चाहूल लागून तो गाऊ लागतो.४०) आंधळ्याला जसा प्रकाशाचा अर्थ कळत नाही, त्याचप्रमाणे स्वतः विचार न करणाऱ्याला ग्रंथाचा अर्थ कळत नाही.
41-60 [Marathi Suvichar] शालेय सुविचार
४१) चांगले विचार मनात फार वेळ टिकत नाहीत म्हणून ते मनात येताच कृती करा.४२) व्यायाम ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.४३) देवळात कासवाची दगडी मूर्ती असते. कासव सारे अवयव आत ओढून घेते. त्याप्रमाणे माणसाने संयम राखावा, म्हणून देवासमोर कासवाची मूर्ती असते.४४) राक्षसासारखी ताकद असणे हे केव्हाही चांगले पण तिचा उपयोग राक्षसी वृत्तीने करणे तितकेच वाईट.४५) प्रयत्न न करणे हेच सर्वात मोठे अपयश आहे.
४६) गाई म्हशींजवळ वाघासारखी नखे व तीक्ष्ण दात नसतात पण प्रसंगी त्या वाघाशी लढून वासरांचे रक्षण करतात.४७) अज्ञानी असणे हा गुन्हा नाही, तर ज्ञान न मिळविण्याचीसाठी धडपड न करणे हा गुन्हा आहे.४८) ज्ञानाने एखाद्याची बुद्धी जिंकता येईल पण हृदय जिंकायचे असेल तर ते सेवेनेच जिंकले पाहिजे.४९) भव्य विचार हा सुगंधासारखा असतो.५०) जगण्याचा आनंद हा जीवनातील चिंता सोडण्यात आहे.
५१) ज्याला हजारो मित्र आहेत, त्याला ते अपुरे वाटतात, परंतु ज्याला एकच शत्रू आहे, त्याला तो सगळीकडे दिसतो.५२) प्रार्थना ही परमेश्वराच्या अधिक जवळ जाण्याची शक्ती आहे.५३) चौकसपणा हा सर्व शिक्षणाचा पाया आहे.५४) जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाची उध्दारी.५५) आळसाला आजचा दिवस दिला की तो उद्याचा दिवस चोरतो.
५६) सारखी आठवण करून दुःखी राहण्यापेक्षा विसरून जा आणि संतोष प्राप्त करून घ्या.५७) छोटी दिसणारी कामेही खरी मोठी असतात. म्हणूनच छोट्या कामांना तुच्छ न समजता तेही केली पाहिजेत.५८) मूर्ख माणसे आपापसांत संभाषण करू लागली, म्हणजे शहाण्या माणसाने मौन धारण करणे हे योग्य.५९) संभाषणावरून माणसाची खरी किंमत होते. चांगल्या व सुसंस्कृत स्वभावाची माणसे साहजिकपणे चांगलेच बोलतात.६०) विवाह म्हणजे शेवटी विलास नसून विकास आहे.
61-100 [Marathi Suvichar] शालेय सुविचार
६१) पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की, ते पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला हृदयाशी कवटाळतो.६२) युद्धाचा जन्म माणसाच्या मनात होतो आणि संरक्षणाची तयारी सुद्धा माणसाच्या मनात होते.६३) पैसा खर्च न करता इतरांच्या आनंदात भर टाकण्याचे एक स्वस्त, सोपे व सुलभ साधन आपल्या प्रत्येकाजवळ आहे, ते म्हणजे स्तुती.६४) विचार परिपक्व झाले की, शब्दांचे रूप घेऊन कागदावर उतरतात.६५) ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण पैशाचे तुम्हाला रक्षण करावे लागते, तर या उलट ज्ञान तुमचे रक्षण करते.
६६) आपल्या पुत्राचे पुरुषात रूपांतर करण्यास आईला वीस वर्षे लागतात. पण याच पुरुषाचे मूर्खात रूपांतर करायला दुसऱ्या स्त्रीस वीस दिवसही लागत नाहीत.६७) आळस एवढा सावकाश प्रवास करतो की, दारिद्र त्याला चटकन गाठते.६८) वाघाप्रमाणे काम करावे, पण वाघाप्रमाणे वागू नये.६९) जोपर्यंत कोणतीही गोष्ट तुमच्या अनुभवाच्या व बुद्धीच्या कसोटीला उतरून खरी ठरत नाही तोपर्यंत तरी, ती कोणीही सांगितलेली असली तरी खरी मानू नका.७०) दोन गोष्टी कधीच वाईट नसतात. एक आपली आई आणि आपली जन्मभूमी.
Xem thêm : क्या आपका फोन कोई ट्रैक कर रहा है, इन कोड्स की मदद से लगाएं पता
७१) मनुष्य एखाद्या वेळी विष पचवू शकेल, परंतु यश पचविणे फार अवघड आहे.७२) आयुष्यात अडचणी सोडविण्यास समर्थ असते तेच शिक्षण होय.७३) कीर्ती हवी असेल तर तिचा पाठलाग करू नका, तिच्याकडे पाठ फिरवा.७४) शरीराला स्नान घालते ते तीर्थ, तर मनाला स्नान घालते ते अमृत.७५) ज्ञानाचे पहिले काम असत्य जाणून घेणे व दुसरे काम सत्याला जाणणे हे आहे.
७६) निसर्गावर हुकूमत गाजवायची असेल तर, त्याच्या आज्ञेचे पालन करा.७७) शत्रू कडून शिकावे पण मित्राला उपदेश करण्याच्या फंदात पडू नये.७८) जो लाभ व्यायाम केल्याने शरीराला होतो, तोच लाभ वाचन केल्याने मनाला होतो.७९) मनुष्य हा मोठा विचित्र प्राणी आहे. तू सुख घटाघटा पितो आणि दुःख चघळीत बसतो.८०) आपल्या मागे आपल्यासंबंधी कोण काय बोलतो, हे जर प्रत्येकाला कळले तर जगात कोणीच कोणाशी बोलणार नाही.
८१) काळजी वाळवी सारखी असते, काही खात असताना ती दिसत नाही, पण कपडा किंवा पुस्तक खाल्ल्यावर मात्र ती दिसते.८२) गुरुचा आदर करावा लागत नाही, तो गुरुच्या दिशेने सहज नदीच्या प्रवाहासारखा वाहत येतो.८३) कवी असा एक आहे की, ज्याच्याजवळ मनुष्याच्या आंतरिक गुढ भावनांना जागृत करण्याचे सामर्थ्य असते.८४) पृथ्वीही शेषाच्या मस्तकावर तरली नसून दलित श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे.८५) मनुष्य कितीही चांगला असला, तरी अधिकाराचे चष्मे त्याच्या डोळ्यास लावल्यावर, पूर्वीचे जग त्याला निराळे दिसू लागते.
[Marathi Suvichar] संस्कार घडविणारे सुविचार
८६) सद्गुणाचा दुरुपयोग केला तर त्याला दुर्गुणाचे स्वरूप प्राप्त होते.८७) आळसावर मात करून, जीवनाच्या मैदानात निश्चयाचा झेंडा जो रोवतो तोच यशस्वी होतो.८८) सध्या तुमच्याजवळ जे लहान काम आहे ते उत्तम प्रकारे करून दाखवा, मग मोठे काम स्वतःहून तुमचा मागवा घेत येईल.८९) जेव्हा मनुष्याकडील धन नष्ट होते, तेव्हा त्याचे वास्तविक काहीच नष्ट होत नाही. जेव्हा मनुष्याचे तब्येत बिघडते, तेव्हा त्याचे काहीतरी नष्ट होते. परंतु जेव्हा मनुष्याचे चारित्र्य नष्ट होते, तेव्हा त्याचे सर्वस्व नष्ट होत असते.९०) प्रार्थना म्हणजे आत्म्याच्या अगाध शक्तीला जागृत करणारे दैवी बळ आहे.
९१) आशावादी असणारा मनुष्य दुःख विसरण्यासाठी हसतो, निराशावादी मनुष्य हसण्याचेच विसरून जातो.९२) तुमच्या मित्राच्या चुका एकांतात सांगा, परंतु त्याची स्तुती मात्र सर्वांपुढे करा.९३) जो बोलवल्याशिवाय येतो, विचारल्याशिवाय बोलतो आणि ज्याच्यावर विश्वास ठेवायला नको त्याच्यावर विश्वास ठेवतो तो मूर्ख असतो.९४) क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतका उत्तम उपाय नाही.९५) ज्याच्या सोबतीला सुंदर विचार असतात तो कधीच एकटा नसतो.
[Marathi Suvichar] विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त सुविचार
९६) एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.९७) वास्तविक कोणी कोणाचा शत्रू असत नाही आणि कोणी कोणाचा मित्र असं नाही. या दोन गोष्टी व्यवहारातून निर्माण होतात.९८) चंद्र व चंदनापेक्षा सज्जनाचा सहवास अधिक शितल असतो.९९) पैसा हा माणसाचे हात किंवा पाय आहे. मग तुम्ही वापरा किंवा वापरू नका.१००) ज्या ज्या दिवशी आपली थोडी सुद्धा प्रगती झाली नसेल तो आपला दिवस फुकट गेला असे समजावे.
१०१) अर्धा तास रिकामे बसण्यापेक्षा कोणतीही काम केलेले अधिक बरे.१०२) प्रत्येक मोठी गोष्ट चांगली असेलच असे नाही. पण प्रत्येक चांगली गोष्ट मात्र मोठी असते.१०३) लोकरंजनातून लोकशिक्षण होत असते.१०४) परिस्थितीशी जुळवून घ्या पण लाचारी पत्करू नका.१०५) पैसा हा मुंगीच्या पायाने येतो आणि हत्तीच्या पायाने जातो.१०६) सार्वभौमत्व मिळाले तरी मन शांत होत नाही पण मन शांत झाल्यावर झोपडीही ऐश्वर्या मान वाटते.१०७) आपल्या यशातील सर्वोत्तम गोष्ट म्हणजे आपण केलेली आपल्या प्रतिस्पर्ध्याची स्तुती.
Get Your Copy Now: Samarthya Vicharanche (Suwichar)
Nguồn: https://craftbg.eu
Danh mục: शिक्षा